मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन-आशीर्वाद यात्रेचं शिवाजी पार्क येथून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद रंगला. अशातच नीलम गोऱ्हे यांनीही नारायण राणेंवर निशाणा साधलाय.
बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. यावर राणेंनी पलटवार केला आहे.
नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं. माझ्यावर टीका करुन कदाचित त्यांना मंत्रीपद मिळेल, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला. राणेंची जन-आशीर्वाद यात्रा आज वसईमध्ये दाखल झाली. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
सांगली जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार; काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप; नीलम गोऱ्हेंचा राणेंवर हल्लाबोल
“RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”