मी आता अमृता वहिनींनाच सांगणार आहे की,…; फडणवीसांसमोर अजित पवारांच्या विधानाने सभागृहात सर्वांना हसू अनावर

0
349

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राज्याचं सध्या हिवाळी अधिवेशन सूरू आहे. यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात जोरदार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. अशातच आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक टोले लगावले आहेत.

यावेळी बोलताना, अजित पवारांनी, एका विषयाबद्दल बोलताना थेट फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा संदर्भ दिला. हा संदर्भ ऐकून सभागृहातील सर्वचजण हसू लागले.

हे ही वाचा : “उद्धव ठाकरे आणि मी, आज नागपूरात मोठा बाॅम्ब फोडणार?; संजय राऊतांच्या गाैफ्यस्फोटाने खळबळ”

भाजपमध्ये आता जे नाते काम करतात त्यात सगळ्यात ताकदवान नेता देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काहीही म्हटलं, कितीही गप्पा मारल्या तरी आहे ते आहे. असं असताना आपण काही लोकांना संधी दिली,” असं अजित पवार म्हणाले.

आज इथल्या (सभागृहातील) महिला बाहेर गेल्या आहेत. तुम्ही महिलांबद्दल सांगताय. भाजपलाही महिलांची मतं मिळाली. सहा महिन्यात एक महिला सापडेना तुम्हाला मंत्री करायला? असा उपहासात्मक सवाल अजित पवारांनी यावेळी केला. अरे हा कुठला कारभार? असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांकडे पाहत अजित पवारांनी, मी आता अमृता वहिनींनाच येऊन सांगणार आहे की जरा बघा यांच्याकडं. त्यांनी मनावर घेतलं की लगेच एकादी महिला मंत्री होईल. मला खात्री आहे,” असं म्हटलं अन् सभागृहामध्ये एकच हशा पिकला. मी टीका म्हणून बोलत नाही. आपण महिलांना पुरुषांच्याबरोबरीनं कामाची संधी द्यावी. निर्णय प्रक्रियेत घ्यावं, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवार खरंच नाराज आहेत का?; उत्तर देताना अजित पवार पत्रकारांवरच भडकले, म्हणाले…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर आता, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले…

“अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्यानं घेतली, राधाकृष्ण विखे पाटलांची भेट, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here