Home नाशिक खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं...

खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य

नाशिक : माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी चौकशी करण्यात आली पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय ईडी कार्यालयात एकनाथ खडसेंची चौकशी झाली. खडसेंनी भाजपला सोडचिट्ठी दिली त्यामुळे त्यांच्यावर ईडीची चौकशी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडवणीस हे शहर बससेवेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांनी खडसे यांच्यावर ईडी प्रकरणी झालेल्या कारवाई बद्दल विचारलं. यावेळी खडसे प्रकरणात मी काय बोलणार, पुरावे असतील म्हणून ईडी करतं असेल, मी ईडीचा प्रवक्ता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, माझ्यावर राजकीय हेतूने चौकशी केली जात असून या ईडीच्या चौकशीत राजकीय वास येत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”

“सरकारचं अपयश झाकण्यासाठी केंद्रातील मंत्रीच नाही, तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

मुंडे भगिनी नाराज नाहीत, अकारण बदनामी करू नका- देवेंद्र फडणवीस

“शिवसेनाप्रमुखांना राणेंची उंची माहीत होती, म्हणूनच त्यांनी राणेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं”