आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
चेन्नई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. हा सामना चेन्नईने 7 विकेट राखून जिंकला.
या सामन्यात चेन्नईने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत केवळ 134 धावाच केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने 26 चेंडूत 3 चाैकार, 1 षटकारासह 34 धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने 21 चेंडूत 1 चाैकार, 1 षटकारासह 21 धावा केल्या. तर चेन्नईकडून रवींद्र जडेजाने 3, तर मथिशा पाथिराना, महिष तीक्षणा व आकाश सिंगने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : …तर उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री असते; अजित पवारांचं मोठं विधान
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना चेन्नईने हे लक्ष्य 18.4 षटकात केवळ 3 विकेट गमावत पूर्ण केलं. चेन्नईकडून सलामीवीर डेव्हाॅन काॅनवेनं 57 चेंडूत 12 चाैकार, 1 षटकारासह नाबाद 77 धावा केल्या. तर रूतुराज गायकवाडने 30 चेंडूत 2 चाैकारांसह 35 धावा करत काॅनवेला चांगली साथ दिली. तर हैदराबादकडून मयंक मार्केंडेयने 2 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या घडामोडी –
“रायगडमध्ये ठाकरेंचा डंका वाजणार, ‘या’ मोठ्या नेत्याची कन्या हाती बांधणार शिवबंधन”
राज्य सरकारला मोठा धक्का; मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
सह्याद्री अतिथीगृहावर खलबतं; राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, पडद्यामागे काय घडतंय?