“दुर्गा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शेकडो शिवसैनिक दाखल, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर”

0
306

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : युवासेनेच्या सचिव, दुर्गा भोसले-शिंदे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने काल रात्री उशिरा उपचारादरम्यान निधन झालं. ठाण्यात काल महाविकास आघाडीच्या जनआक्रोश मोर्चात त्या सहभागी झाल्या होत्या.

आज त्यांच्या अंत्यविधीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुंबईत पेडर रोड परिसरात दाखल झाले.

ही बातमी पण वाचा : “कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”

ठाकरे कुटुंबाने दुर्गा भोसले यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी दाखल होत, त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पेडर रोड परिसरात दुर्गा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. ठाकरे कुटुंबाकडून दुर्गा यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं. यावेळी रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

काँग्रेसला अंतर्गत वादाचा फटका; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

एकमेकांवर टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या अडचणींवर बोला; ठाकरे-फडणवीस वादावर ‘या’ नेत्याची टीका

शिखर धवन-प्रभसिमरण सिंगची विस्फोटक खेळी, अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पंजाबची राजस्थानवर 5 धावांनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here