आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण – डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेससोडून भाजप व इतर पक्षात गेलेले काँग्रेसचे पदाधिकारी पुन्हा घरवापसी करत आहेत.
दोन दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या पाठोपाठ आता भाजपचे पदाधिकारी काँग्रेसमध्ये येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा होणार आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांच्यासह शेकडो पदाधिकारी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
ही बातमी पण वाचा : “मोठी बातमी! मंत्री आदिती तटकरे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”
दरम्यान, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश मुथा यांनी भाजपवर आरोप करत भाजपमध्ये सर्वांना समान संधी मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही ठराविक जणांनाच संधी दिली जाते. त्यांच्याकडून भेदभाव केला जातो. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमुळे पक्षात काम करण्यास संधी मिळत नाही, असे आरोप मुथा यांनी केले आहे. यामुळे आपण पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत अल्याचे मुथा यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नारायण राणेंचा जरांगे पाटील यांना इशारा, म्हणाले…
मोठी बातमी! अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणाचा मृत्यू
मनसे कार्यकर्त्यांचा मिटकरींच्या गाडीवर हल्ला; कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल