Home महाराष्ट्र “हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे! ‘रोझ डे’ ठरला काळजाचा...

“हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे! ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा”

मुंबई : 7 फेब्रुवारीपासून प्रेम व्यक्त करण्याचा आठवडा सुरु झाला आहे. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये प्रियकराने प्रेयसीला पेटवल्याची धक्कादायक घटना समोर आली.

मुंबईतील जोगेश्वरीमध्ये प्रियकरानं प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं. त्यानंतर प्रेयसीने पेटलेल्या अवस्थेत प्रियकराला मिठी मारली. त्यामुळे प्रियकरचा जागीच मृत्यू झाला असून प्रेयसीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कळत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव विजय खांबे असून त्याचे आपल्या भावाच्या धाकट्या मेव्हणीशी गेल्या अडीच वर्षापासून प्रेमसंबंध होते. विजयला त्या मेव्हनीशी लग्न करायचं होतं. परंतु विजय व्यसनाच्या आहारी गेला असल्यानं प्रेयसीच्या आई-वडिलांनी त्याचा लग्नाचा प्रस्ताव फेटाळला होता. प्रेयसीलाही नंतर विजयशी लग्न करायचं नव्हतं. विजयच्या त्रासामुळं प्रेयसीनं काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. एक दिवस प्रेयसी घरात एकटी असताना विजय तिला भेटायला गेला. तेव्हा त्यांच्यात वाद झाला आणि पुढील धक्कादायक घटना घडली.

महत्वाच्या घडामोडी

“देशाची न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांच्या टाचेखाली याविषयी कुणाच्या मनात दुमत नाही”

ते म्हणतात आम्ही वचन तोडलं, पण…- अमित शहा

“नारायण राणेंचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे निव्वळ विनोद, त्याकडे फारसं लक्ष देऊ नका”

मुंबईमध्ये भाजपला अजून एक झटका; अजून एका नेत्याचा शिवसेनेत प्रवेश