Home महाराष्ट्र …तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक

…तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक

औरंगाबाद : केंद्रातील मोदी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभरात जन आशिर्वाद यात्रा काढण्यात येणार आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर 16 ऑगस्टपासून ही जन आशिर्वाद यात्रा निघणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी गोपीनाथगडावरच माझा पहिला सत्कार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते स्वीकारणार आणि यात्रेची सुरवात करणार असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, सरचिटणीस यांच्याकडून आम्हा सगळ्या मंत्र्यांना 16 ऑगस्टनंतरच पाच लोकसभा मतदारसंघात जनआशिर्वाद यात्रा काढण्यासंदर्भात पत्र मिळाले आहे. दिल्लीहून मी थेट हैदराबाद आणि तिथून नांदेडला जाणार आहे. जन आशिर्वाद यात्रेचा शुभारंभ करण्याआधी मी गोपीनाथगडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून तिथे नतमस्तक होणार आहे. त्यांनतर गोपीनाथगडावरच माझा पहिला सत्कार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते स्वीकारणार असं, डॉ. भागवत कराड  म्हणाले आहेत.

मराठवाड्यात अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली पाच लोकसभा मतदारसंघात यात्रा काढून संवाद साधण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर डॉ. भागवत कराड हे हैदराबादहून नांदेड आणि तिथून गोपीनाथगडावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात निर्बंधात शिथिलता दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी

“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”

ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली; काँग्रेस