Home महाराष्ट्र अजित पवार म्हणाले, संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; आता नारायण...

अजित पवार म्हणाले, संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; आता नारायण राणे म्हणतात…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

बँक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते. संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही. सतीश सावंत ज्यांच्या नेतृत्वाखाली बॅकेत काम करत होते ते काय काय काम सांगत होते, हे सर्वांनाच माहिती आहे, असं म्हणत अजित पवारांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. यावरून आता राणेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

हे ही वाचा : “उद्धवसाहेब, नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं, त्यांच्या माघारी आम्हाला मदतीची गरज”

कोकणात मंजूर निधी आर्थिक वर्ष संपायला 3 महिने शिल्लक आहे तरी 1 रुपया खर्च नाही. हा यांचा कारभार आणि आले मोठे अकलेचे धडे शिकवणारे असं म्हणत राणेंनी अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

मी अजित पवार यांना 100 कोटी रुपये तरी देऊन जा म्हणालो. लघपाटबंधाऱ्याचं टेंडर काढलं नाही, 13 कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही. वर्ष संपायला 3 महिने आहेत तरी 1 रुपयाही खर्च नाही. हा यांचा कारभार आहे. त्यांना मी रस्त्यांची काय स्थिती आहे ते बघून जा म्हणून सांगितलं. विमानतळापासून सर्व रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. हा यांचा कारभार आणि मोठे अकलेचे धडे शिकवतात. अर्थसंकल्प कसं मांडलं जातं यावरून आमच्या सर्व विचारवंतांची अक्कल कळते, असा टोला राणेंनी यावेळी अजित पवारांना लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

राणेंच्या अडचणीत वाढ; शिवसैनिकावर हल्ल्याप्रकरणी राणेंच्या कट्टर समर्थकाला अटक

“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”

कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला