Home महाराष्ट्र तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नाशिक दौऱ्यानंतर मनसे आध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ते, पदाधिऱ्यांशी संवाद साधला. मुंबईतील प्रभादेवीच्या रविंद्र नाट्यमंदिरात मनसेचा पदाधिकारी मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरे यांच्या भाषणानं रंगत आणली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली. तसंच राज यांनी यावेळी बोलताना, शिवसेनेतून कसे बाहेर पडले, यावर पहिल्यांदा भाष्य केलं आहे.

तसेच बाळासाहेबांना ही गोष्ट कळल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती?, याबाबतही राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : गणेश चतुर्दशीनंतर मनसेची तोफ राज्यभर धडाडणार; राज ठाकरे घेणार राज्यभर सभा आणि मेळावे

मी शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर पडलो नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांच्या बंडांशी माझी तुलना करू नका. हे सर्व जण एका पक्षात आणि सत्तेत गेले., असं राज ठाकरे म्हणाले.

मी बाळासाहेबांना भेटून आणि सांगून बाहेर पडलेलो आहे. बाळासाहेबांशी भेटीदरम्यान मनोहर जोशी माझ्यासोबत होते. जोशी बाहेर गेल्यावर बाळासाहेबांनी मला बोलावलं. असे हात पसरले, मीठी मारली आणि म्हणाले जा… त्यादरम्यान बाळासाहेबांना समजलं होतं. त्यामुळे मी दगाफटका करून, पाठित खंजीर खुपसून बाहेर पडलो नाही. बाहेर पडून कोणत्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी

राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त खोक्याचीच भाषा कळते; शिंदे गटाची टीका

राज-उद्धव एकत्र येणार का?; बाळा नांदगावकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…