मुंबई : जळगाव येथे रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय करोनाबाधित वृद्धेचा मृतदेह सहा दिवसांनी बुधवारी सकाळी रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आला. या घटनेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी हळहळ व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून विचार केला तर या गोष्टीबद्दल प्रचंड दु:ख आणि संताप वाटतो. राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार? आवाज उठवायलाच हवा, असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
सध्याच्या काळात माध्यमांमध्ये रोज कोरोनासंबंधी बातम्या येत आहेत. काही सकारात्मक तर काही नकारात्मक. पण काल एक बातमी माझ्या वाचनात आली आणि मन सुन्न झालं. pic.twitter.com/Vhxok9vI2T
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 12, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्तेच होणार”
धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला
माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा… ; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र
‘या’ कारणामुळे काँग्रेस नाराज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी करणार स्वतंत्र चर्चा