गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं सोनू सूदचं कौतुक, म्हणाले…

0
172

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘सामना’मधील लेखातून सोनूच्या सूदच्या या बचावकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना देशमुख यांनी सोनू सूदच्या कामाची स्तुती केली आहे.

संजय राऊत यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही. पण कोरोनाविरोधातील लढाईत सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. सोनू सूद यांचं कार्य चांगलं आहे. त्यांच मी अभिनंदन करतो, असं म्हणत अनिल देशमुख यांनी सोनु सूद यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातील काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकारला’ अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा महाबली, बाहुबली किंवा सुपरहिरो आहे, असं चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात झाले, असं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

…आणि मगच मुलांना शाळेत बोलावावं; माजी शिक्षणमंत्र्यांचा राज्य सरकारला टोला

आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल; हसन मुश्रीफ यांचा फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here