Home महाराष्ट्र ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड...

ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती; जितेंद्र आव्हाड आक्रमक

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली करण्यात आली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

‘भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही’ असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान खाली घातली असती, असं ट्विट करत आव्हाडांनी भाजपवर टीका केली आहे.

बुधवारी न्यायमूर्ती मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचार सुनावणी प्रकरणात भाजप नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्यावर अजून एफआयआर का दाखल नाही, असं विचारत पोलिसांना खडेबोल सुनावले. त्यांनतर लगेचच त्यांची बदली करण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“सावरकर हे भाजपसाठी श्रद्धेचा विषय नसून राजकारणाचा विषय”

..तर ते भ्रमात आहेत; शिवसेनेचा सामनातून भाजपवर निशाणा

आदित्य ठाकरेंनी केलेल्या टिकेवर अमृता फडणवीसांच प्रत्यृत्तर, म्हणतात…

ठाकरे सरकारचा नवीन निर्णय; आता महिलांचा लैंगिक छळ, बलात्कार केल्यास थेट फाशी