मुंबई : मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुःख कितीही मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. “मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.
बुधवारी शरद पवार यांनी राज्याच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक ठेवली होती. राजेश टोपे या बैठकीला अनुपस्थित असणार असं सर्वांनी गृहित धरलं होतं. पण राजेश टोपे आवर्जून बैठकीला उपस्थित राहिले” असं राष्ट्रवादीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मराठवाड्यात सर्वसामान्य घरात मर्तिकानंतर साधारणतः १४ दिवसांचा कठोर दुखवटा पाळण्याची पद्धत आहे. पण आपल्या मतदारसंघातील लोकभावना बाजूला सारून कर्तव्यपूर्ततेसाठी राजेश टोपे यांनी अवघ्या तीन दिवसांचा दुखवटा पाळून पुन्हा कार्यरत होणं हा मराठवाड्यातील जनतेसाठी एक नवा पायंडा आहे,” असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.
मातृनिधनाचं दुःख बाजूस सारून आरोग्यमंत्री ना. @rajeshtope11 हे पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुःख मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. pic.twitter.com/KoUqun88lt
— NCP (@NCPspeaks) August 6, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न
वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले; जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान
मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन