आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण यांनी याप्रकरणी नांदेड जिल्हा अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे. तसेच, आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. ते नांदेड मध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
बोगस लेटरपॅडच्या अधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
हे ही वाचा : शिंदे गटाचा ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला
संबंधित आरोप करताना अशोक चव्हाणांनी यावेळी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र संबंधित बोगस पत्र तयार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यामागचा मूख्य सूत्रधार कोण आहे, हे शोधून काढलं पाहिजे, अशी मागणीही अशोक चव्हाणांनी यावेळी केली.
दरम्यान, सध्या माझ्यावर पाळत ठेवली जात आहे. अशोक चव्हाण कुठे चालले. गाडीने कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर पाळत ठेवली जात आहे. याचा विनायक मेटे करा, यालाही मेटेंसारखं संपवा, अशीही चर्चा सुरू आहे, असा खळबळजनक दावाही अशोक चव्हाण यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
आम्ही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी; पुण्यात शिवसैनिकांची पोस्टरबाजी
“संजंय राऊत यांनी आपल्या आवकातीत रहावं “; ‘या’ भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य