सोलापूर : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यात ते बोलत होते.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अन्यथा भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांचं कधीही भरुन न येणारं नुकसान झालं आहे. पण अद्याप पंचनामे झालेले नाहीत. तसेच अजून पंचनाम्याची सुरुवातही झाली नाही. सरकारनं दीर्घकालीन उपाययोजना करावी, पण त्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी देखील यावेळी प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अभिनेत्री कंगणा रणाैतला बलात्काराची धमकी
प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
केंद्र सरकार निश्चित मदत करेल, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
जोस बटलर-स्टिव्ह स्मिथची मॅच विनिंग पार्टनरशिप; राजस्थानचा चेन्नईवर 7 विकेट्सनी विजय