मुंबई : राज्यातील कोणत्याही आमदाराला पगार न देता शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं धोरण अखायला हवं, असं मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यातील सर्व आमदारांना पगार देऊ नका. इतकच नाही तर आय ए एस अधिकाऱ्यांनाही तीन महिने पगार न देता तेच पैसे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावेत, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.
राज्यात आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सर्व संस्थानी एकत्र येऊन या विषयावर एक धोरण आखलं पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, एकीकडे सर्व आमदारांची पगार वाढवण्याची मागणी सूरु आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू त्याला विरोध करत आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
-महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारणं म्हणजे द्वेषाचं राजकारण- अमोल कोल्हे
-शिवसेनेने अपयशी लोकांना सोबत घेऊन जनादेशाचा अनादर केला- देवेंद्र फडणवीस
-सावरकरांबाबत काँग्रेस सेवादलाचं वादग्रस्त पुस्तक; संजय राऊत आक्रमक
-सचिन सावंत यांनी केली ‘टिकटॉक’ स्टाईलने फडणवीसांवर टीका