पुणे : देशातील वाढत्या महागाईमुळे जनता त्रासलेली असतानाच आता पुन्हा गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..! महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी !, असं रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आज पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत २५ रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत ७५ रुपयांची भाववाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे मनःपूर्वक आभार..!
महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्याबद्दल धन्यवाद मोदीजी ! pic.twitter.com/jcSpffsD7N— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका
“…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”
“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”
लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?