मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्या 74 वर्षाच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. राजेश टोपे यांच्या आईला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
आईला हद्यविकाराचा आणि मूत्रपिंडाचा आजार होता. एक वर्षाचा असताना तिची हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. रोज सकाळी तिची भेट घेतो. संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा भेटतो. आईची काळजी घेण्यासह राज्याला गरज असताना कार्यरत असणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे टोपे यांनी त्यांच्या आईची प्रकृती गंभीर झाली होती त्यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
दरम्यान, जालन्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पार्थिवावर उद्या 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड, जिल्हा जालना येथे करण्यात येणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस
आंदोलनावरून खोत-शेट्टी भिडले, खोत म्हणतात, ‘हे काजू शेट्टी’ तर शेट्टी म्हणाले, ‘खोत भ्रमिष्ट झाले’
हे सरकार आंधळ्याचे, मुक्याचे आणि बहिऱ्यांचे सरकार असून….; सदाभाऊ खोत यांची राज्य सरकारवर टीका
“महाविकासआघाडी सरकार म्हणजे एका नवऱ्याच्या दोन बायका”