बीड : राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी कोरोनावर मात केली असून बीडमधील आपल्या घरी सध्या ते क्वारंटाइन आहेत. लॉकडाउनमध्ये काम करत असताना दोन महिने मी जिल्ह्याबाहेर पडलो नव्हतो. मुंबईत गेलो तरी आपल्याला काही होणार नाही हा अति आत्मविश्वास मला नडला, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती सध्या चांगली असून आई-वडिलांच्या पुण्याईने मिळालेलं हे नवीन जीवन जनतेच्या सेवेत घालवणार आहे, अशा भावना धनंजय मुंडेंनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आईचा चेहरा दिसला, असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं. काही झालं तरी घऱात एकुलता एक मुलगा असल्याने आणि तिने खूप कष्ट घेऊन मोठं केलं आहे. पण तिच्यामुळेच आपल्याला लढायचं बळ मिळालं असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतं, हे चालतं का?- चंद्रकांत पाटील
“व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाच्या मदतीसाठी धावले खासदार धैर्यशील माने”
“पडळकरांचं जेवढं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम”- रोहित पवार