मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहे. याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. तेएबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्रात दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरू झालं आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मी मराठी आहे म्हणजे मी मराठी भाषा बोलणारा माणूस आहे. महाराष्ट्रातील या भागात आम्ही मराठी बोलणारे लोक तसंच या भागात तामिळ, गुजराती, बंगाली बोलणारे लोक. भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती देश निर्माण होण्याच्याही आधीपासूनच आहेत. पण माझी भाषा आणि संस्कृती दुसऱ्यांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा लोकांना कमजोर करणं योग्य नाही. किती वर्षे उत्तर आणि दक्षिणेत सुरू असलेला संघर्ष आपण पाहिला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा भारत आजपर्यंत आपण पाहात आलो असून त्यातूनच या गोष्टी बिघडल्या आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
हिंदुत्व ही बाळासाहेबांसाठी ‘साधना’, तर उद्धव ठाकरेंसाठी…; गोपीचंद पडळकरांची टीका
“संजय राठोडांच्या विरोधात आणखी एका महिलेची पोलिसात तक्रार; चित्रा वाघ यांनी दिली माहिती
चंद्रकांत पाटील यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही- अशोक चव्हाण
घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी