“हाथरसमधली घटना पाशवी; महाराष्ट्राला जाब विचारणारे आज गप्प का?”

0
192

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 19 वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधली घटना पाशवी, पण अशी घटना महाराष्ट्रात घडली असती तर स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान,या प्रकरणात सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे मुलीचा मृतदेह घरी न देता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे सरकार आणि तेथील प्रशासनाला नेमकं काय लपवायचं आहे?, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“रोहित शर्माचे शानदार अर्धशतक; मुंबईचे पंजाबसमोर 192 धावांचे लक्ष्य”

ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे- अण्णा हजारे

नटवीसाठी आकांडतांडव करणाऱ्यांनी आता पीडित मुलीच्या न्यायाची लढाई लढावी- संजय राऊत

“उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात सहन करणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here