मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर या ठिकाणी महिलांवर बलात्कार होण्याच्या घटना घडल्या. याप्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात सहन होणार नाही. महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्यांनी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घराच्या बाहेर पडावं अन्यथा…; मराठा आंदोलकांचा इशारा
हा लढून मरणारा समाज आहे हे लक्षात ठेवा- छत्रपती संभाजीराजे
“भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण”
…अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल- पार्थ पवार