आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
हैदराबाद : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट गमावत 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने 40 चेंडूत 64 धावांची वेगवान खेळी केली. तर तिलक वर्मा 17 चेंडूत 37 धावा, इशान किशनने 31 चेंडूत 37 धावा, तर कर्णधार रोहित शर्माने 18 चेंडूत 28 धावा केल्या. तर हैदराबादकडून मार्को यान्सेनने 2, तर भुवनेश्वर कुमार व टी. नटराजनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
ही बातमी पण वाचा : जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अजित दादांचं रोखठोक स्पष्टीकरण
दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 19.5 षटकात 178 धावांवर आटोपला. हैदराबादकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 41 चेंडूत 4 चाैकार, 1 षटकारासह 48 धावांची खेळी केली. तर हेनरीच क्लासेनने 16 चेंडूत 4 चाैकार, 2 षटकारांसह 36 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र या दोन खेळाडूंव्यतिरिक्त हैदराबादच्या इतर फलंदाजांनी निराशा केल्याने हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. तर मुंबईकडून जेसन बेहरनडाॅर्फ, रायली मैरेडिथ, पियूष चावलाने प्रत्येकी 2, तर कॅमेरून ग्रीन व अर्जुन तेंडूलकरने 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवार भाजपसोबत आले तर…; उदय सामंत यांचं मोठं विधान
चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात
अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा