कॅनबेरा : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 303 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरूवात खराब झाली. भारताने आपल्या पहिल्या 5 विकेट्स केवळ 152 धावांत गमावल्या होत्या. नंतर मात्र रविंद्र जडेजा व हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत भारताला 300 धावांचा पल्ला गाठून दिला. भारताकडून हार्दिक पांड्याने 76 चेंडूत नाबाद 92 धावा, रविंद्र जडेजाने 50 चेंडूत नाबाद 66 धावा, कर्णधार विराट कोहलीने 78 चेंडूत 63 धावा, तर मालिकेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने 39 चेंडूत 33 धावा केल्या.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरने 2, तर हेझलवूड, सीन अॅबाॅट व अॅडम झैम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण”
अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला
तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील
नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी