शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंकजा म्हणाल्या, ‘भेटलं पाहिजे’

0
789

मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील  अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही ट्विटरवरून पंकजांना शुभेच्छा दिल्या. त्यावर पंकजांनी, ‘चला भेटूया’ अशा आशयाचं उत्तर दिलं.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव, लोकप्रिय नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! असे ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी दुपारच्या सुमारास केले. त्यावर ‘धन्यवाद, फारच गोड. आपण भेटलं पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया पंकजांनी दिली. त्याला प्रतिसाद देत उर्मिला मातोंडकर यांनीही ‘कधीही, माझ्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. ’ असं उत्तर दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे आहेत”

ठाकरे सरकारनं पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली- केशव उपाध्ये

मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का, हे एकदा पहावं लागेल- नारायण राणे

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here