Home जळगाव “नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे...

“नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे आहेत”

जळगाव : चिपळूणवरील परिस्थितीवरून भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

राज्यात संकट येत आहेत त्याला मुख्यमंत्र्यांचा पायगुण कारणीभूत आहे. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय, कोरोना काय सर्व चालू आहे. कोरोना त्यांची देण आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊन आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे आहेत का, असा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्‍यावर मोठं संकट आहे. अशात राजकारण करायला नको. राज्‍यावर आलेल्‍या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्‍याने राज्‍यावर संकट आल्‍याचे वक्‍तव्‍य केलं. मात्र, राणे हे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं. म्‍हणजे राणेच पांढऱ्या पायाचे आहेत, असं जोरदार प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिलं. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, संकटात सापडलेल्या व्‍यक्‍तीला सर्वतोपरी मदत करायला हवी. माणसाने माणसाला मदत करण्यासाठी एकत्र यायला हवं. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेंव्‍हा वेळ असते तेंव्‍हा तुमचा झेंडा घेवून तुम्‍ही उतरा, आमचा झेंडा घेवून आम्‍ही आखाड्यात उतरु. मात्र, राज्‍य संकटात असताना राजकारण करणे योग्‍य नसल्‍याचं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारनं पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली- केशव उपाध्ये

मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का, हे एकदा पहावं लागेल- नारायण राणे

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात संरक्षण भिंत उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

“सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीतील पूरग्रस्तांशी संवाद”