Home महाराष्ट्र “मनसे ‘या’ ठिकाणी लावणार दिवसातून 5 वेळा हनुमान चालिसा”

“मनसे ‘या’ ठिकाणी लावणार दिवसातून 5 वेळा हनुमान चालिसा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याला बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला होता. तसेच राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरही भाष्य केलं.

मशिदीवरील भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिक व कार्यकर्त्यांना दिला. यावरून मनसेत तीव्र प्रतिसाद उमटत आहेत.

हे ही वाचा : …तर सोमय्या बाप-बेटांना जेलमध्ये जावंच लागणार; संजय राऊतांचा इशारा

श्रीरामपूर येथील मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे त्वरीत न हटविल्यास प्रत्येक चौकात व मंदिरावर दिवसातून पाच वेळेस हनुमान चालिसा चालू करण्यात येईल, असे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आले.

दरम्यान, श्रीरामपूर शहर व ग्रामीण मधील मशिदींवरील भोंगे त्वरीत हटविण्यात यावे. आमच्या निवेदनाची दखल घेऊन 2 ते 3 दिवसांमध्ये भोंगे न हटविल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चौकाचौकांत व प्रत्येक मंदिरात भोंगे लावुन हनुमान चालिसा पठण दिवसांतून 5 वेळेस करण्यात येईल. याप्रसंगी काही जातीय तेढ निर्माण झाल्यास सर्वस्वी पोलिस प्रशासनाची जबाबदारी राहील, असं या निवेदनात बाबा शिंदे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरेंची नाराजी खुद्द राज ठाकरे दूर करणार, शिवतीर्थवर भेटीसाठी बोलावलं”

पॅट कमिन्सची वादळी खेळी; कोलकाताचा मुंबईवर 5 गडी राखून दणदणीत विजय

“पुढचे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच दिसतील; ‘या’ नेत्याचा दावा”