मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या असतानाचं त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली. यावर चित्रा वाघ यांनी याप्रकरणात माझा आवाज दाबण्यासाठी सुड बुद्धीने गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली.
आ.चित्राताई, श्री किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता. आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात. त्यामुळे दिशाभूल करू नये., असं अमोल मिटकरी म्हणाले.
आ.चित्राताई,श्री किशोर वाघ सरांवर 12 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपने 2016 ला याबाबत खुली चौकशी सुरू केली होती. आपण भाजपात गेला नसता तर देवेंद्र फडणवीसांनी तेव्हाच गुन्हा दाखल केला असता.
आपण साहेबांच्या तालमीत तयार झाल्या आहात.त्यामुळे दिशाभूल करू नये. pic.twitter.com/0JuGDXjGBN— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान
“महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन होणार नाही”
“साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का, की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”
टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूची चाैथ्या कसोटीतून माघार; BCCI ने दिली माहिती