आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यानंतर भाजप नेत्यांकडूनही त्यावर प्रत्युत्तर सुरूच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे नसते तर नरेंद्र मोदींचं अस्तित्व कधीच संपलं असतं, असा घणाघात भास्कर जाधव यांनी केला. ते सावर्डे येथील एका मेळाव्यात बोलत होते.
हे ही वाचा : “भोरमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार, 50 कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश”
शिवसेनेचे बोट धरून हे भाजपावाले आज महाराष्ट्रात मोठे झाले. शिवसेना प्रमुखांमुळे देशामध्ये भाजपा मोठी झाली आहे. सोशल मिडीयावर आमच्या नरेंद्र मोदी 1984 साली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत युती केली तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या फोटोवर तुम्ही मोठे झाले. गुजरात दंगलीनंतर नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकण्याच्या निर्णयासाठी लालकृष्ण अडवाणी बाळासाहेबांना भेटायला आले. बाळासाहेबांनी वाटेल ते झाले तरी चालेल नरेंद्र मोदींना बदलायचे नाही असे म्हटले. बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे, नाहीतर त्या दिवशीच घरी गेले असते, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांविषयी बोलताना जरासं भान बाळगा; निलेश लंके चंद्रकांत पाटलांवर भडकले
भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेते प्रवेश करणार; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा
“चंद्रकांत पाटलांनी काश्मीरला जाऊन अतिरेक्यांना दम द्यावा, आम्हांला शहाणपण शिकवू नये”