आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसोबत बंड करत शिवसेनेविरोधात बंड केलं. आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे आता शिवसेनेच 2 गट निर्माण झालेत.
एक गट ठाकरेंचा तर दुसरा शिंदेंचा. अशातच ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचा मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. मात्र या विस्तारानंतर शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आज बोलताना एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
हे ही वाचा : “महिला पत्रकाराशी बोलताना संभाजी भिडेंचं वादग्रस्त विधान, म्हणाले, आधी कुंकू लाव, मग…”
शिंदे गटातील संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात आहेत, असा गाैफ्यस्फोट सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. त्या महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या.
शिंदे गटातील काही आमदार नाराज असून संजय शिरसाट आमच्या संपर्कात आहेत. शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत. शिरसाट यांना पश्चात्ताप होत आहे, असं विधान सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
पहिलीच वेळ असल्याने माफ करतो म्हणणाऱ्या बच्चू कडूंना, रवी राणांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
“मोठी बातमी! संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण”