मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे, यावर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्या सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार! महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव ! आणी महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा विजय ! जल्लोष साजरा करणार, असं ट्विट करत राम कदम यांनी राज्या सरकारला टोला लगावला आहे.
उद्या सकाळी 11 वाजता #सिद्धिविनायक मंदिरात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत , वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार! महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारूण पराभव ! आणी महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा विजय ! जल्लोष साजरा करणार
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 15, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“धक्कादायक! बीडमध्ये प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न”
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय म्हणजे…; रामदास आठवलेंची राज्य सरकारवर टीका
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी होण्याचा मान नितीश कुमारांना; उद्या घेणार शपथ
अभिनेत्री दिशा पटाणी लाल बिकीणीत मालदीवच्या किनारी; चाहते म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास