आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अमरावती : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला आज एक वर्ष पूर्ण झाले असून शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल. पण, अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे अनेक आमदारांनी वेळोवेळो नाराजी व्यक्त केली आहे. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख, आमदार बच्चू कडू यांनी शिंदे-भाजपा सरकारला घरचा आहेर दिला आहे.
“मंत्रिमंडळ विस्तार करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही,” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ही बातमी पण वाचा : “…तर एकनाथ शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं असतं”
“कुठं दु:ख, तर कुठं सुख आहे. सर्वच गोष्टी पूर्ण झाल्यात असं नाही. एकनाथ शिंदे यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. दिव्यांग मंत्रालय, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले. शेतकऱ्यांना पहिल्यांदा २ हजार कोटी नंतर १५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे. १५ ते २० वर्षाच्या काळात नुकसान भरपाईची सर्वात जास्त मदत या सरकारच्या काळात दिली आहे,” असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हा’ मोठा नेता भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ”
चुंबन पोझमध्ये फोटो काढताना नवऱ्याचा संयम सुटला, अन् …
“काँग्रेसनं काढला विधानसभेच्या पराभवाचा वचपा, घरच्या मैदानावर, विखे पाटलांना मोठा धक्का”