औरंगाबाद : भाजपचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला.
मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं म्हणत दानवेंनी सत्तारांना उद्देशून म्हणाले. अब्दुल सत्तार खूप झालं, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हान दानवेंनी सत्तारांना यावेळी दिलं.
दरम्यान, गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं ओपन चॅलेंज आहे की, सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असा टोला दानवेंनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
… म्हणून चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलं चॉकलेट
“…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु”; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा
“राज्य सरकारने मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याची सवय आता बंद करावी”
भाजपच्या जन आशीर्वाद कोरोना नियमांचे उल्लंघन; चार गुन्हे दाखल