‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांवर निशाणा

0
183

मुंबई : आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या, असं म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंतिम वर्षाच्या परिक्षावरून सुरू असलेल्या विद्यार्थांमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. चला तरुणांचे भविष्य वाचवू या अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी भयभीत आहेतच शिवाय नोकरी धंदा जाईल म्हणून पालकांचा जीवही धोक्यात आला आहे. त्यात सरकारचा गोंधळात गोंधळ, त्यामुळे दुर्दैवाने विद्यार्थी तणावात आहेत. त्यात सरकारचा गोंधळात गोंधळ, अशी टीका आशिष शेलार यांनी सरकारवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

“आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्तेच होणार”

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला

माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा… ; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here