आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आयपीएलच्या आजच्या राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थानचा 7 विकेट्सन पराभव केला.
बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावत 149 धावा केल्या. राजस्थानकडून सलामीवीर एविन लुइेसने सर्वाधिक 37 चेंडूत 58 धावांची विस्फोटक खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने 22 चेंडूत 31 धावा केल्या. बेंगलोरकडून हर्षल पटेलने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करताना 3 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहल व शाहबाज अहमदने प्रत्येकी 2, तर पहिलाच आयपीएल सामना खेळणाऱ्या गार्टनने 1 विकेट घेतली.
धावांचा पाठलाग करताना आरसीबीने धडाकेबाज सुरूवात केली. विराट कोहली व देवदत्त पडीक्कलने धमाकेदार सुरूवात करताना 48 धावांची भागीदारी केली. कोहलीने 20 चेंडूत 25 धावा केल्या. तर पडीक्कलने 17 चेंडूत 22 धावा केल्या. नंतर मात्र दोघेही ठराविक अंतराने बाद झाले. नंतर आलेल्या मैक्सवेल व के.एस.भरतने शानदार फलंदाजी करत आरसीबीला विजयाच्या आसपास नेलं. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात भरत बाद झाला. नंतर मैक्सवेलने एक बाजू सांभाळत आरसीबीला विजय मिळवून दिला. भरतने 35 चेंजूत 44 धावा केल्या. तर मैक्सवेलने 30 चेंडूत 50 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. व आरसीबीने हा सामना 17.1 षटकात 3 विकेट गमावत जिंकला. तर राजस्थानकडून मुस्तफिजूर रेहमानने 2 विकेट घेतल्या.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसला मोठा धक्का; 11 समर्थक दिल्लीकडे रवाना, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सत्ताधारी वाघाचा वाटा खात आहेत; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल
“लायकीत रहायचं, अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”