गिरीश महाजन म्हणाले, शिवसेनेसोबतचा आमचा 25 वर्षांचा संसार तोडला, आता जयंत पाटील म्हणतात…

0
584

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगावात शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाच्या लग्नात सर्व नेते मंडळी एकत्र आले होते, मात्र या लग्न सोहळ्यातही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर राजकीय टोलेबाजी करताना दिसून आले.

हे ही वाचा : राज्यातील निर्बंध वाढणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं विधान, म्हणाले…

सत्ताधाऱ्यांना आधी गिरीश महाजन यांनी टोला लगावला. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यावरून गिरीश महाजन यांनी आमचा 25 वर्षांचा संसार होता तो तुम्ही मोडला, असा टोला गिरीश महाजनांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. तसेच विरोधी पक्षाकडून भाऊ शुभेच्छा तुम्हाला घ्याव्या लागतील, असंही महाजन म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत महाजनांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

त्यांची ती खंत आहे, दुःख आहे. आम्ही फारस लक्ष देत नाही. त्यांचा संसार का मोडला आहे. याच उत्तर उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दिल आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळता इतरांशी हातमिळवणी केली, त्यामुळे…; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here