Home महत्वाच्या बातम्या शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

शिवसेनेनं 2014 मध्येच मुख्यमंत्रिपद मागितलं होतं, पण…; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : 2014 मध्ये राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विषय नव्हता. आम्ही शिवसेनेसोबतच जाणार होतो. सुरुवातीला शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. पण आम्ही 122 होतो. त्यामुळे ते शक्य झाले नाही. मग आवाजी मतदानाने सरकार स्थापन केलं. असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये भाजप-शिवसनेच्या युतीवर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हे ही वाचा : निलंबित केल्याने शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; म्हणाल्या…

तेव्हा राष्ट्रवादीने जी भूमिका घेतली त्याचा आम्हाला फायदा झाला. पण आम्ही राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जेव्हा आपल्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात जिवंत राहावे लागते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घरात बसूनच राज्यातील परिस्थिती हाताळायची आहे. घरात बसून सगळं चांगलं दिसतं. पण त्याचे समर्थन करू नका. कोरोना हा देशभरात होता. केंद्रानेही या काळात चांगले काम केले. समाजातील कुठल्याही घटकाला हे सरकार न्याय देऊ शकले नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाचा शिवसेनेला दणका; भाजपात प्रवेश करणाऱ्या 10 नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला स्थगिती

शिवसेनेविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करा; मनसेची पोलिसांकडे तक्रार

महिलांवरील अत्याचार वाढण्यास महाआघाडी सरकारच जबाबदार; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल