कोथरुड – देशाचे नेते शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. महाराष्ट्रातील पावरफुल नेता अशी पवारांची ओळख आहे. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त देशभर कार्यकर्त्यांकडून वेगवेळे उपक्रम राबविले जात आहेत. अशातच आता पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी एक अनोखा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त कोथरूड मधील नागरिकांना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी पेट्रोल हे 86 रुपये प्रति लिटर या दराने दिले जाणार आहे. तरी या सुविधेचा लाभ सर्व नागरिकांना व्यवस्थित घेता यावा यासाठी कूपन पद्धती अवलंबिण्यात येणार आहे. एका व्यक्तीला एका कूपनवर एका दुचाकीसाठी एक लिटर पेट्रोल हे त्या दिवशी 86 रुपये या दराने दिले जाणार आहे. कोथरूडमधील कर्वे पुतळा येथील लोढा HP पेट्रोल पंपावर ८६ रुपये प्रतिलीटर दराने पेट्रोल दिले जाणार आहे. 12 डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेतच या सवलतीचा नागरिकांना फायदा घेता येईल, अशी माहिती गिरीश गुरनानी यांनी दिली.

