रस्ते कामांना सर्किट बेंच चा ‘स्पीड आदेश’! महापालिकेचा १०० कोटी प्रकल्प तीन महिन्यांत पूर्ण”

0
151

 

कोल्हापूर-:  १०० कोटींच्या १४ रस्त्यांची कामे तीन महिन्यात पूर्ण — कोल्हापूर महापालिकेचा सर्किट बेंचमध्ये पूर्णता अहवाल सादर

कोल्हापूर : शहरातील नागरी सुविधा योजनेअंतर्गत १०० कोटींच्या खर्चातून १४ प्रमुख रस्त्यांचे काम महापालिकेतर्फे प्राधान्याने सुरू असून, येत्या तीन महिन्यांत सर्व कामे पूर्ण होतील, असा पूर्णता अहवाल महापालिकेने कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सादर केला.न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि अजित कडेठाणकर यांच्या खंडपीठात हा अहवाल सादर करण्यात आला.

 

कामांची सद्यस्थिती : नेमके काय झाले आहे?महापालिकेने दिलेल्या तपशीलानुसार —

✓ १४ पैकी १० रस्त्यांची कामे पूर्ण-:शहरातील मोठ्या वाहतूक दाबाच्या रस्त्यांवर डांबरीकरण व मजबुतीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.

✓ उर्वरित ४ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर-:या रस्त्यांवर संरचनात्मक दुरुस्ती, डांबर थर टाकणे, खड्डे दुरुस्ती आदी कामे सुरू असून पुढील २ ते ३ महिन्यांत पूर्ण होणार आहेत.

✓ २५ रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू-:पावसामुळे रखडलेली प्रक्रिया आता वेगाने चालू असून, लवकरच या २५ रस्त्यांसाठी काम आदेश काढले जातील.

 

१६ रस्त्यांच्या सुधारणा कामांना तांत्रिक मंजुरी-:कोल्हापूर शहरातील आणखी १६ रस्त्यांची तांत्रिक मंजुरी पूर्ण झाली असून त्यांची एकूण लांबी १९ किमी आहे.या रस्त्यांवरील कामे जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने सुरू होतील अशी माहिती महापालिकेने कोर्टाला दिली.

प्लॅन्ट, दुरुस्ती, देखरेख — कामाला आता वेग

२ कोटींचा ब्लिक्स प्लांट भाड्याने-:महापालिकेने ब्लिक्स-मिक्स प्लांट भाड्याने घेतल्यामुळे खड्डे भरण्याची प्रक्रिया गतीने सुरू झाली आहे.त्या मदतीने मुख्य रस्त्यांवरील खड्डे दूर करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

विशेष समन्वय अधिकारी नियुक्त-:सर्व रस्ते प्रकल्पांवर एकाच बिंदूवरून देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत.

 

पुर्तता अहवालात काय नमूद केले? — एक नजर

* १०० कोटींच्या १४ रस्त्यांची कामे प्रगतीपथावर

* १० रस्त्यांची कामे पूर्ण

* उर्वरित ४ रस्त्यांचे काम सुरू

* २५ रस्त्यांची निविदा प्रक्रिया

* ३२ रस्त्यांची तपासणी व मोजणी

* पावसामुळे विलंब झालेल्या कामांना नवी गती

* ९ रस्त्यांवरील मुरूम काढून डांबर थर

* १६ रस्त्यांचे १९ किमी काम लवकरच सुरू

* ७ रस्त्यांचे ड्रेनेज दुरुस्ती, पाइपलाइन काम सुरू

* दर्जात्मक तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा

* अतिउत्पादन मोजणीसाठी उपाययोजना

* अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू

अतिक्रमण हटविण्यासाठी ‘विशेष आराखडा’

सर्किट बेंचने महापालिकेला वारंवार दिलेल्या सूचनेनुसार,-:मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेने संपूर्ण आराखडा तयार केला आहे.नियमभंगावरील कारवाई, अतिक्रमण हटविणे, वाहतुकीचे मार्ग व्यवस्थित ठेवणे यात भर देण्यात आली आहे.

 

कोर्टाची सूचना – वेळेत कामे पूर्ण करा

न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांनी कामे वेळेत पूर्ण करणे आणि दर्जात्मक तपासणीवर भर देण्याचे आदेश दिले.महापालिकेने सर्व कामांचे नियोजन पुन्हा आखून, प्राधान्यानुसार रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्याची खात्री दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here