सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा

0
1400

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकानही बंद होईल’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसवर केली होती. याला राष्ट्रवादीनं प्रत्युत्तर दिलंय.

“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मर्यादा राखून बोलावे. सत्तेचा माज चढला असेल तर सत्तेच्या बाहेर पडा. नाना पटोले यांचे ‘विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमात्र दुकान बंद पडेल’ हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी आवाक्याबाहेर जाऊन वक्तव्य करू नये, असं राष्ट्रवादीेचे नेते प्रविण कुंटे म्हणाले

हे ही वाचा : सत्तेसाठी नाना पटोले तलवार मान्य करतात; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

“नाना पटोले यांची जलसंपदामंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेण्याची लायकी नाही. साकोली विधानसभा मतदारसंघात त्यांचा झालेला निसटता विजय राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच झाला हे त्यांनी विसरू नये. पटोलेंमध्ये धमक असेल तर सत्तेच्या बाहेर पडून दाखवावे. तशी धमक नसेल तर बिनशर्त माफी मागावी. अजित पवार व जयंत पाटील लोकनेते असून वारंवार पक्ष बदलणाऱ्या नानाभाऊंनी भाजपाची सुपारी घेतल्यासारखे बोलू नये, असंही प्रविण कुंटे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”

शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; आता पिंपरीतील ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here