Home महाराष्ट्र सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे

सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली याची माहिती समोर आली पाहिजे

मुंबई : सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली, कुठे-कुठे सेटिंग झाले, याची संपूर्ण माहिती पुढे आली पाहिजे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. आणि त्यात मुस्लिमांना सुद्धा फायदा मिळतोच आहे. पण सत्तेसाठी शिवसेनेने काय-काय तडजोड केली, कुठे-कुठे सेटिंग झाली आहे, याची संपूर्ण माहिती पुढे आली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकार बनवताना शिवसेनेनं आपली विचारधारा सोडून काय काय मॅनेज केलंय याची माहिती द्यायला हवी. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्दयावरुन देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनावर निशाणा; म्हणतात…

“मराठा तरूणांना न्याय देण्यास ठाकरे सरकार असमर्थ”

मुख्यमंत्री काही करत नाहीत सगळं अजित पवार करतात- नारायण राणे

अमृता फडणवीस यांना आवरा; शिवसेनेचं भैय्याजी जोशी यांना पत्र