सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील विद्यार्थिंनींसाठी महत्वाच्या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना त्यांच्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. मात्र, सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेत ही योजना 7 वर्षांपासून सुरु आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून शालेय मुलींना फ्री एसटीची सोय ही योजना सुरु करण्यात आली. तसेच गेल्या 7 वर्षांपासून मलकापूर नगरपरिषद ही योजना यशस्वीपणे राबवत आहे.
दरम्यान, यावर्षी राज्याच्या अर्थसंकल्पात शालेय मुलींसाठी फ्री एसटी बसची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी मलकापूरमध्ये ही योजना 2013 पासून सुरु आहे. तसेच मलकापूर नगरपरिषद ही योजना स्वखर्चातून राबवते.
महत्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! जळगावमध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू”
“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधी यांना शाळेत पाठवण्यात यावं”
“नाशिकमध्ये उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 पूर्णपणे बंद”