आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार कंबर कसली असून पक्षवाढीसाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी, परवा दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा दाैरा केला होता.
या दाैऱ्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंवर काैतुकांचा वर्षाव केला.
हे ही वाचा : “उद्धव ठाकरेंची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
मी राष्ट्रवादी काँग्रेसचा गेल्या 35 वर्षांपासून कार्यकर्ता आहे, त्याचबरोबर मागील अडीच वर्षे मी उद्धव ठाकरेंसोबत काम केलं आहे. त्यावेळी मला त्यांच्या स्वभावात एक उदार अंत:करणाचा माणूस दिसला, त्यांच्या हृदयातून वाहणारे प्रेम दिसले, म्हणून मी त्यांच्या दौऱ्यानिमित्त इथे थांबलो आहे, अशी स्तुतीसुमने जितेंद्र आव्हाडांनी उद्धव ठाकरेंवर उधळली.
दरम्यान, मी आजारी असताना आणि जगण्याची कोणतीही शक्यता नसताना एका हॉस्पिटलमधून हलवून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात आलं होतं. त्या फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दिग्गज डॉक्टरांची फौज उभी केली होती, असंही आव्हाडांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘…तर भाजपसोबत युती करायला तयार आहोत’; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य
स्वतःच्या सोयीनुसार बोलणं ही भाजपची भूमिका; पदवीधर निवडणुकीवरून ठाकरे गटाचा निशाणा