“शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मंत्रीपद परत मिळणार?; चर्चांना उधाण”

0
442

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहचले आहेत. त्यामुळे संजय राठोड यांना मंत्रीमंडळात पुन्हा संधी मिळणार का?, यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

वनमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीस आले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. तसेच संजय राठोड यांच्या सोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत.

हे ही वाचा : राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

दरम्यान, एका प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ते खातं अजूनही रिक्त आहे. त्यामुळे ते खातं संजय राठोड यांना परत मिळणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेच्या ‘या’ आमदारांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

संजय राऊत सध्या नैराश्येत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही- देवेंद्र फडणवीस

मी, बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त, अंध भक्त नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here