कोट्यवधींची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

0
359

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : कोट्यवधींची जमीन हडप करून फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेचे माजी सभागृह नेते, भाजपचे माजी नगरसेवक श्रीनिवास आशप्पा करली यांच्या विरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी पण वाचा : टोलनाका तोडफोडीच्या घटनेवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..“अमित महाराष्ट्रभर टोलनाके…”

एका प्रतिष्ठित घराण्यातून वडिलोपार्जित वारसा हक्काने तीन मुलींना मिळालेल्या कोट्यवधी रूपये किंमतीच्या १३ हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर खोट्या आणि बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर भूखंड तयार केले आणि जमिनीचा स्वतः मालक असल्याचे भासवून ५० ते ६० व्यक्तींना भूखंडांची विक्री करून मूळ जमीनमालकांसह भूखंड खरेदी केलेल्या व्यक्तींची फसवणूक श्रीनिवास आशप्पा करली यांनी केली आहे.

दरम्यान, अटकेनंतर श्रीनिवास आशप्पा यांना तीन दिवसांची पोलीस कोठडीही मिळाली आहे. हा फसवणूकीचा प्रकार सोलापूर शहरातील मजरेवाडीत घडला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “मुंबईत उद्या रेड अलर्ट जारी, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, गरज असेल तरच बाहेर पडा; महापालिका आयुक्तांचे निर्देश”

 “मणिपूरमध्ये 2 महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या, पुरूषांची जात…”

“दुर्देवी! कोल्हापूरच्या केशवराज भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकून महिलेचा मृत्यू”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here