” ‘या’ गोष्टीसाठी, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल यांनी केला पवारांचा विश्वासघात”

0
339

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवार यांनी बंड करत राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांना घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. बंड होताच शरद पवार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. तातडीने शरद पवार यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली आहेत.

काही दिवसांआधी राष्ट्रवादीत अनेक पक्षाअंतर्गत बदल करण्यात आले होते. शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांकडून नामंजूर करण्यात आला.

ही बातमी पण वाचा : सुप्रिया सुळेंचीही हकालपट्टी करणार का?; अजित पवारांनी, एकाच वाक्यात विषय संपविला, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीला भरवण्यात आलेल्या सभेत शरद पवार यांनी दोन कार्याध्यक्ष पद निर्माण केले. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू प्रफुल्ल पटेल आणि पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्ष पदावर नेमणूक केली. मात्र आता प्रफुल्ल पटेल यांनीच शरद पवारांचा विश्वासघात केला आहे. तसेच अजित पवार यांच्या बंडामागे प्रफुल्ल पटेल असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, राज्यात सर्वत्र चर्चा आहे ती प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची साथ कशी आणि कोणत्या कारणामुळे सोडली? याच पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांना थेट केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिंदे जर मुख्यमंत्री असतील, तर मला मंत्रीपदही नको; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा खळबळजनक दावा

“आता ठाकरे बंधू एकत्र येणार?; मनसेच्या बैठकीत मनसैनिकांचा राज ठाकरेंसमोरच सूर”

अजित पवारांना मोठा धक्का! अमोल कोल्हेंनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले…मी शरद पवारांसोबत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here