विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी

0
641

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे निश्चित केल्यानंतर आता राष्ट्रवादी अणि कॉंग्रेसकडूनही आपले पत्ते उघड करण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी एकनाथ खडसे आण रामराजे निंबाळकर यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. तर काँग्रेसने पक्षाचे मुंबई शहराध्यक्ष भाई जगताप यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.

हे ही वाचा : विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं

दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या पंकजा मुंडे आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर नेत्यांचा पत्ता कट झाला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या खलीला तुमच्या मदतीची गरज; मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्ट करत का केली विनंती?”

महाविकास आघाडीवर टीका करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची जीभ घसरली, म्हणाले…

चिरीट तोम्मया, आमदार शिवसेनेला मतदान करतीलच, पण तुमच्यावर…; दिपाली सय्यद यांचा सोमय्यांवर हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here