आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांच्या गोटात हालचाली घडत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीसोबत काही देणंघेणं नाही. ठाकरे गटासोबत राजकीय युती आहे. पण आपला महाविकास आघाडीशी संबंध नाही, असं प्रकाश आंबेडकर स्पष्ट म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : लोकसभेत राहुल गांधींनी, भाजप खासदारांना दिलेल्या प्लाईंग किसवर, आता प्रियांका चतुर्वेदींची प्रतिक्रिया, म्हणाल्या…
“आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहोत. भाजपच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. आम्ही आमचे उमेदवार उभे करु ना. आमची ठाकरे गटासोबत युती आहे. महाविकास आघाडीचं ठरलेलं असेल. पण आमचं मी आणि शिवसेना ठरवणार आहोत. किंवा आमचं ठरलेलं आहे. महाविकास आघाडीचं काही असेल ते त्यांचं बघतील. आम्ही कशाला डोकं लावायचं? आम्ही आमचं कशाला ब्लडप्रेशर वाढवायचं? आम्ही काय म्हणालो, आमची आघाडी शिवसेनेबरोबर आहे. आमचा जो काही समझौता होईल तो शिवसेनेबरोबर होईल”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एनडीएच्या बैठकीत मोठं वक्तव्य; म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत…
उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंकडे नेतृत्व दिलं पाहिजे, तरच…; या नेत्याचं मोठं विधान
जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर? विजय वडेट्टीवर यांची प्रतिक्रिया,म्हणाले…