“शरद पवारांवरील विधानानंतर पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल”

0
196

बारामती :  शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.

शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणं गोपीचंद पडळकर यांना भोवलं आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावर बारामतीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रार अर्ज दिला होता. तसेच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित तक्रारीवरुन आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर 505(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘ही’ भाजपची परंपरा नाही; पडळकरांनी केलेल्या टीकेवर भातखळकरांच वक्तव्य

‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणावर सुनावणी; ठाकरे सरकारची भक्कम तयारी

पडळकरांच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही पण…; निलेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करु नका; धनंजय मुंडेंची पडळकरांवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here